Thursday, August 17, 2023

स्वातंत्र्य दिन विशेष भित्तिपत्रिका

 भारत एक दृष्टिक्षेप - स्वातंत्र्यदिन विशेष भित्तिपत्रिका



    श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागामार्फत दि. १५ ऑगस्ट, २०२३ रोजी ७७ व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने 'भारत - एक दृष्टिक्षेप' याविषयाधारित एका विशेष भित्तिपत्रिकेचे आयोजन करण्यात आले होते. सदर भित्तिपत्रिकेचे उद्घाटन महाविद्यालयाच्या माननीय प्रभारी प्राचार्य प्रो. डॉ त्रिशला कदम यांच्या हस्ते पार पडले. राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा वर्षा पोतदार यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये विद्यार्थिनींनी 'एका बाजूस भारताची विविध क्षेत्रातील आघाडी तर दुसर्‍या बाजूला भारतासमोरील विविध आव्हानांचा' आढावा भित्तिपत्रिकेच्या माध्यमातून घेतला होता. सदर उपक्रमामध्ये राज्यशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यीनींनी सहभाग घेतला. डॉ मिनाक्षी मिणचे व डॉ मोहन कांबळे यांचे सहकार्य लाभले. महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थिनींची याप्रसंगी उपस्थिती होती.


Tuesday, July 25, 2023

गांधी विचार संस्कार परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यीनींचे अभिनंदन

 'स्व'चा शोध म्हणजे व्यक्तीमत्व विकास - प्रो. डॉ. भारती पाटील 












         समाजवादी प्रबोधिनी व श्रीमती आ. रा. पाटील कन्या महाविद्यालयाच्या वतीने आयोजित 'शोध स्वत:चा' या विषयावर बोलत असताना प्रो. डॉ. भारती पाटील यांनी असे मत व्यक्त केले की, "मनुस्मृती सह अनेक ग्रंथांनी स्त्रिला स्वातंत्र्य नाकारले. परंतु आपण जोतिबा व सावित्रीच्या लेकी म्हणून सत्य धर्माची जोपासना केली पाहिजे. संस्कृतीचे वहन करताना सदसदविवेकबुद्धी अतिशय महत्त्वाची असते." कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या मा. प्राचार्य डॉ. त्रिशला कदम होत्या. तसेच ज्येष्ठ साहित्यिका तारा भवाळकर व ज्येष्ठ समीक्षक प्रो. अविनाश सप्रे हे प्रमुख पाहुणे होते. समाजवादी प्रबोधिनीचे संचालक श्री प्रसाद कुलकर्णी समाजवादी लायब्ररीच्या प्रमुख सौदामिनी कुलकर्णी, सप्रे मॅडम यांची ही उपस्थिती होती. यावेळी राज्यशास्त्र विभागामार्फत 'गांधी रिसर्च फाउंडेशन जळगाव आणि राज्यशास्त्र विभाग' यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या गांधी विचार संस्कार परीक्षेमध्ये ज्या विद्यार्थिनींनी उज्वल यश संपादित केले त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. दरवर्षी प्रमाणे 2022-23 मध्ये राज्यशास्त्र विभागाने गांधी विचार संस्कार परीक्षेचे आयोजन केले होते. यामध्ये जवळपास महाविद्यालयातील ६० विद्यार्थीनींनी सहभाग घेतला होता. महाराष्ट्रातील अनेक शाळा महाविद्यालयातून विद्यार्थी या परीक्षांसाठी सहभागी होत असतात. महात्मा गांधी यांच्या विचारांच्या संस्कारांची जाणीवपूर्वक जोपासना व्हावी, हा यामागील उद्देश असतो. आपल्या महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागातील अनेक विद्यार्थिनींनी या परीक्षेत सहभाग घेतला. तसेच अनेकांनी उज्वल यश संपादित केले. यामध्ये हर्षदा हणमंत कांबळे या बी कॉम भाग एकच्या विद्यार्थिनीने प्रथम वर्ष विभागात कोल्हापूर जिल्ह्यातून प्रथम क्रमांक प्राप्त केला याबद्दल तिला मान्यवरांच्या हस्ते गोल्ड मेडल व प्रमाणपत्र देण्यात आले. निकिता लक्ष्मण पाटणकर या बी कॉम भाग 3 च्या विद्यार्थिनीने तृतीय वर्ष विभागातून कोल्हापूर जिल्ह्यातून द्वितीय क्रमांक संपादित केला याबद्दल तिला सिल्वर मेडल आणि प्रमाणपत्र उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. तसेच महाविद्यालयीन स्तरावर तेजश्री भिमराव शिंदे हिने प्रथम वर्ष विभागात द्वितीय क्रमांक, नेहा संदीप माळी हिने प्रथम वर्ष विभागात तृतीय क्रमांक, मुस्कान दस्तगीर मिराखान हिने द्वितीय वर्षात प्रथम क्रमांक, सुप्रिया दिलीप सवाईराम द्वितीय वर्ष द्वितीय क्रमांक, अवंतिका भरत माळी द्वितीय वर्ष तृतीय क्रमांक, स्वाती अशोक केंगार तृतीय वर्ष द्वितीय क्रमांक आणि हर्षदा आप्पासाहेब आवळे तृतीय वर्ष तृतीय क्रमांक संपादित केला. अशाप्रकारे महाविद्यालयीन पातळीवर देखील विद्यार्थिनींनी चांगले यश प्राप्त केले याबद्दल त्यांचे मान्यवरांच्या हस्ते अभिनंदन करण्यात आले. तसेच यशस्वी आयोजनाबद्दल राज्यशास्त्र विभागप्रमुख व  गांधी विचार संस्कार परीक्षेच्या समन्वयक प्रा. वर्षा पोतदार यांचे व त्यांचे सहकारी डॉ. मिनाक्षी मिणचे व डॉ. मोहन कांबळे यांचे ही मान्यवरांच्या हस्ते अभिनंदन करण्यात आले.   



Saturday, November 26, 2022

 26 नोव्हेंबर संविधान स्वीकृती दिन विशेष राज्यशास्त्र विभाग आयोजित स्पंदन भित्तिपत्रिका

  

'भारतीय संविधान एक दृष्टिक्षेप' याविषयी राज्यशास्त्र विभागामार्फत आयोजित भित्तिपत्रिकेचे उद्घाटन करताना माननीय श्री सुनील स्वामी (शिक्षक व सामाजिक कार्यकर्ते महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती) महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉक्टर त्रिशला कदम, प्रा वर्षा पोतदार, डॉ. मिनाक्षी मिणचे इतर प्राध्यापक व विद्यार्थीनी. 

       राज्यशास्त्र विभागामार्फत आयोजित 

'जागर संविधानाचा' याविषयी कार्यशाळा 

 
या कार्यशाळेत भारतीय संविधानाचा सरनामा आणि त्याचे मूलभूत तत्वज्ञान याविषयी मार्गदर्शन करताना प्रमुख मार्गदर्शक माननीय श्री सुनील स्वामी सर 

        राज्यशास्त्र विभागाच्या वतीने आज 26 नोव्हेंबर या दिवशी संविधान दिनानिमित्त संविधान प्रतीस अभिवादन करण्यात आले. जागर संविधानाचा याविषयी एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी कार्यशाळेच्या सुरुवातीस भारतीय संविधानाच्या सरनाम्याचे सामूहिक वाचन घेण्यात आले. राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. वर्षा पोतदार यांनी सामूहिक वाचन करून घेतले. तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत केले. मा. श्री सुनील स्वामी यांनी "देशाचे सत्ता कारण हे संविधानानुसार चालले पाहिजे. बहुभाषिक, बहुधार्मिक, बहुल संस्कृती असणाऱ्या आपल्या देशाला एकात्मतेच्या सूत्रात बांधण्याचे कार्य आपले भारतीय संविधान करते. आपल्या लोकशाही राष्ट्रात संविधान हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. कारण अंतिम सत्ता ही भारतीय म्हणजेच आपल्या लोकांच्या हाती आहे. " असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ त्रिशला कदम या होत्या. विवेकवाहिनी व गृहविज्ञान विभाग प्रमुख प्रा. संगीता पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. मीनाक्षी मिणचे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. प्रा. किरण कानडे यांनी या कार्यक्रमाचे आभार मानले. बीए व बी कॉम मधील बहुसंख्य विद्यार्थिनी व प्राध्यापक वर्ग यावेळी उपस्थित होते. 

Monday, October 31, 2022

 सरदार वल्लभभाई पटेल जयंती दिन विशेष  

'राष्ट्रीय एकता दिवस - ३१ ऑक्टोबर'  

             सरदार वल्लभभाई पटेल हे ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी, उत्कृष्ट वकील, सच्चे सत्याग्रही व कुशल राजकारण पटू होते. स्वतंत्र भारताचे हंगामी सरकार मधील पहिले गृहमंत्री व उपपंतप्रधान होते.   मरणोत्तर भारतरत्न उपाधीने गौरविलेले भारताचे लोहपुरूष सरदार पटेल यांच्या मृत्युनंतर त्यांचा उल्लेख द टाइम्स ने "बिस्मार्कपेक्षाही उत्कृष्ट राजकारणपटू" असा केला होता. अखंड भारताचे स्वप्न ज्यांच्या मुळे शक्य झाले त्या महामानवाला, त्यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन. 🙏


स्वर्गीय इंदिरा गांधी पुण्यतिथी दिवस 


             भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान, सर्वाधिक काळ पंतप्रधानपदावर राहून ज्यांनी अतिशय धाडसी निर्णय घेतले व भारताची प्रतिमा आंतरराष्ट्रीय पातळीवर निर्माण केली.  भारताच्या आयर्न लेडीला ३१ ऑक्टोबर, १९८४ रोजी आपल्या प्राणास मुकावे लागले. त्यांची हत्या त्यांच्याच अंगरक्षकांनी केली. ही बाब खूप दुर्दैवी होती. तरीही त्यांच्या अनमोल राष्ट्र उभारणीतील योगदानाची आठवण करणे हे आपले कर्तव्य आहे.   

श्रीमती इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन. 🙏

राज्यशास्त्र विभागामार्फत या दोन्ही पुण्यशील महामानवांना विनम्र आदरांजली. 

Monday, October 17, 2022

"महात्मा गांधी व्यक्ती आणि विचार विशेष पोस्टर प्रदर्शन उदघाटन संपन्न"

   
        राज्यशास्त्र विभागामार्फत महात्मा गांधी जयंती सप्ताह विशेष निमित्त महात्मा गांधी व्यक्ती आणि विचार या विषया अनुषंगाने महात्मा गांधी यांचा जीवन परिचय, त्यांचे सत्याग्रहाचे मार्ग, तंत्रे व त्यांनी सांगितलेला विश्वस्त वृत्तीचा सिद्धांत, त्यांचे शिक्षण विषयक विचार, महात्मा गांधींच्या विचारांची प्रासंगिकता, इत्यादी विविध मुद्द्यांच्या आधारे विशेष पोस्टर प्रदर्शन आयोजित करण्यात आले. यामध्ये विभाग दोन मधील विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला. या कार्यक्रमाचे उद्घाटन प्राध्यापक विशाल कांबळे (डी के ए एस सी महाविद्यालय इचलकरंजी राज्यशास्त्र विभागप्रमुख) यांनी केले. प्राचार्य डॉ. त्रिशला कदम यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापिका वर्षा पोतदार यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केलेले होते. 
       या पोस्टर प्रदर्शन कार्यक्रमासाठी डॉ. मीनाक्षी मिणचे आणि डॉ. मोहन कांबळे यांचे सहकार्य लाभले. महाविद्यालयातील सर्व विद्यार्थिनी आणि प्राध्यापक बंधू भगिनी यांनी सदर पोस्टर प्रदर्शनास भेट दिली.