Tuesday, July 25, 2023

गांधी विचार संस्कार परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यीनींचे अभिनंदन

 'स्व'चा शोध म्हणजे व्यक्तीमत्व विकास - प्रो. डॉ. भारती पाटील 












         समाजवादी प्रबोधिनी व श्रीमती आ. रा. पाटील कन्या महाविद्यालयाच्या वतीने आयोजित 'शोध स्वत:चा' या विषयावर बोलत असताना प्रो. डॉ. भारती पाटील यांनी असे मत व्यक्त केले की, "मनुस्मृती सह अनेक ग्रंथांनी स्त्रिला स्वातंत्र्य नाकारले. परंतु आपण जोतिबा व सावित्रीच्या लेकी म्हणून सत्य धर्माची जोपासना केली पाहिजे. संस्कृतीचे वहन करताना सदसदविवेकबुद्धी अतिशय महत्त्वाची असते." कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या मा. प्राचार्य डॉ. त्रिशला कदम होत्या. तसेच ज्येष्ठ साहित्यिका तारा भवाळकर व ज्येष्ठ समीक्षक प्रो. अविनाश सप्रे हे प्रमुख पाहुणे होते. समाजवादी प्रबोधिनीचे संचालक श्री प्रसाद कुलकर्णी समाजवादी लायब्ररीच्या प्रमुख सौदामिनी कुलकर्णी, सप्रे मॅडम यांची ही उपस्थिती होती. यावेळी राज्यशास्त्र विभागामार्फत 'गांधी रिसर्च फाउंडेशन जळगाव आणि राज्यशास्त्र विभाग' यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या गांधी विचार संस्कार परीक्षेमध्ये ज्या विद्यार्थिनींनी उज्वल यश संपादित केले त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. दरवर्षी प्रमाणे 2022-23 मध्ये राज्यशास्त्र विभागाने गांधी विचार संस्कार परीक्षेचे आयोजन केले होते. यामध्ये जवळपास महाविद्यालयातील ६० विद्यार्थीनींनी सहभाग घेतला होता. महाराष्ट्रातील अनेक शाळा महाविद्यालयातून विद्यार्थी या परीक्षांसाठी सहभागी होत असतात. महात्मा गांधी यांच्या विचारांच्या संस्कारांची जाणीवपूर्वक जोपासना व्हावी, हा यामागील उद्देश असतो. आपल्या महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागातील अनेक विद्यार्थिनींनी या परीक्षेत सहभाग घेतला. तसेच अनेकांनी उज्वल यश संपादित केले. यामध्ये हर्षदा हणमंत कांबळे या बी कॉम भाग एकच्या विद्यार्थिनीने प्रथम वर्ष विभागात कोल्हापूर जिल्ह्यातून प्रथम क्रमांक प्राप्त केला याबद्दल तिला मान्यवरांच्या हस्ते गोल्ड मेडल व प्रमाणपत्र देण्यात आले. निकिता लक्ष्मण पाटणकर या बी कॉम भाग 3 च्या विद्यार्थिनीने तृतीय वर्ष विभागातून कोल्हापूर जिल्ह्यातून द्वितीय क्रमांक संपादित केला याबद्दल तिला सिल्वर मेडल आणि प्रमाणपत्र उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. तसेच महाविद्यालयीन स्तरावर तेजश्री भिमराव शिंदे हिने प्रथम वर्ष विभागात द्वितीय क्रमांक, नेहा संदीप माळी हिने प्रथम वर्ष विभागात तृतीय क्रमांक, मुस्कान दस्तगीर मिराखान हिने द्वितीय वर्षात प्रथम क्रमांक, सुप्रिया दिलीप सवाईराम द्वितीय वर्ष द्वितीय क्रमांक, अवंतिका भरत माळी द्वितीय वर्ष तृतीय क्रमांक, स्वाती अशोक केंगार तृतीय वर्ष द्वितीय क्रमांक आणि हर्षदा आप्पासाहेब आवळे तृतीय वर्ष तृतीय क्रमांक संपादित केला. अशाप्रकारे महाविद्यालयीन पातळीवर देखील विद्यार्थिनींनी चांगले यश प्राप्त केले याबद्दल त्यांचे मान्यवरांच्या हस्ते अभिनंदन करण्यात आले. तसेच यशस्वी आयोजनाबद्दल राज्यशास्त्र विभागप्रमुख व  गांधी विचार संस्कार परीक्षेच्या समन्वयक प्रा. वर्षा पोतदार यांचे व त्यांचे सहकारी डॉ. मिनाक्षी मिणचे व डॉ. मोहन कांबळे यांचे ही मान्यवरांच्या हस्ते अभिनंदन करण्यात आले.   



No comments:

Post a Comment