Saturday, November 26, 2022

 26 नोव्हेंबर संविधान स्वीकृती दिन विशेष राज्यशास्त्र विभाग आयोजित स्पंदन भित्तिपत्रिका

  

'भारतीय संविधान एक दृष्टिक्षेप' याविषयी राज्यशास्त्र विभागामार्फत आयोजित भित्तिपत्रिकेचे उद्घाटन करताना माननीय श्री सुनील स्वामी (शिक्षक व सामाजिक कार्यकर्ते महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती) महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉक्टर त्रिशला कदम, प्रा वर्षा पोतदार, डॉ. मिनाक्षी मिणचे इतर प्राध्यापक व विद्यार्थीनी. 

       राज्यशास्त्र विभागामार्फत आयोजित 

'जागर संविधानाचा' याविषयी कार्यशाळा 

 
या कार्यशाळेत भारतीय संविधानाचा सरनामा आणि त्याचे मूलभूत तत्वज्ञान याविषयी मार्गदर्शन करताना प्रमुख मार्गदर्शक माननीय श्री सुनील स्वामी सर 

        राज्यशास्त्र विभागाच्या वतीने आज 26 नोव्हेंबर या दिवशी संविधान दिनानिमित्त संविधान प्रतीस अभिवादन करण्यात आले. जागर संविधानाचा याविषयी एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी कार्यशाळेच्या सुरुवातीस भारतीय संविधानाच्या सरनाम्याचे सामूहिक वाचन घेण्यात आले. राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. वर्षा पोतदार यांनी सामूहिक वाचन करून घेतले. तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत केले. मा. श्री सुनील स्वामी यांनी "देशाचे सत्ता कारण हे संविधानानुसार चालले पाहिजे. बहुभाषिक, बहुधार्मिक, बहुल संस्कृती असणाऱ्या आपल्या देशाला एकात्मतेच्या सूत्रात बांधण्याचे कार्य आपले भारतीय संविधान करते. आपल्या लोकशाही राष्ट्रात संविधान हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. कारण अंतिम सत्ता ही भारतीय म्हणजेच आपल्या लोकांच्या हाती आहे. " असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ त्रिशला कदम या होत्या. विवेकवाहिनी व गृहविज्ञान विभाग प्रमुख प्रा. संगीता पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. मीनाक्षी मिणचे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. प्रा. किरण कानडे यांनी या कार्यक्रमाचे आभार मानले. बीए व बी कॉम मधील बहुसंख्य विद्यार्थिनी व प्राध्यापक वर्ग यावेळी उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment