Friday, May 6, 2022

सामंजस्य करारानुसार फॅकल्टी एक्सचेंज प्रोग्राम अंतर्गत व्याख्यानाचे आयोजन.

  "आंतरराष्ट्रीय पातळीवर शांतता प्रस्थापित होणे गरजेचे; अन्यथा तिसरे महायुद्ध अटळ" - प्रा. डॉ. व्ही. बी. शिंदे.

श्रीमती आ. रा. पाटील कन्या महाविद्यालय, इचलकरंजी येथील राज्यशास्त्र विभाग आणि डी. के. ए. एस. सी येथील राज्यशास्त्र विभाग यांच्या मध्ये झालेल्या सामंजस्य करारानुसार संयुक्त विद्यमाने आयोजित व्याख्यान प्रसंगी डॉ. शिंदे सर यांनी वरीलप्रमाणे मत व्यक्त केले. आपल्या मार्गदर्शांनामध्ये त्यांनी असे सांगितले की, 'या सर्व राष्ट्रांच्या जागतिक राजकीय हालचालीमागे 'विस्तारवाद' हे प्रमुख कारण आहे.' सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. वर्षा पोतदार यांनी केले. सुरूवातीस राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दीनिमित्त 100 सेकंड स्तब्ध राहून त्यांना आदरांजली देण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल पाटील हे होते. प्रा. विशाल कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे आभार प्रा. दत्तात्रय जाधव यांनी केले. तर सूत्रसंचालन विभागाची विद्यार्थिनी कु. प्रतीक्षा कांबळे हिने केले. बहुसंख्य विद्यार्थिनी व प्राध्यापक या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. 



5 comments: