Thursday, April 14, 2022

श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालय, इचलकरंजी. 
राज्यशास्त्र विभाग यांच्या वतीने 
‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर' यांच्या जयंतीनिमित्त आयोजित 

'डॉ. बाबासाहेब आंबेडकर - जीवन व कार्य' या विषयावर 

online e - quiz आयोजित केली आहे. 

आपण सहभाग नोंदवावा. धन्यवाद.  🙏   



    स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजनीतिज्ञ, तत्त्वज्ञ, समाजसुधारक, पत्रकार, वकील, दलित बौद्ध चळवळीचे प्रेरणास्थान आणि भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती. १४ एप्रिल १८९१ रोजी बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला. प्रचंड बुद्धिमत्ता, समाजासाठी असीम त्याग करणारे, दलित समाजाला हक्क मिळवून देणारे, महाडचा सत्याग्रह, मनुस्मृतीचे दहन, मंदिर सत्याग्रह, शेतकऱ्यांचा कैवारी, गोलमेज परिषद, पुणे करार, स्वतंत्र मजूर पक्ष, बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना, दलित शिक्षण संस्थेची स्थापना, पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना, महिलांसाठी कार्य, स्वातंत्र्य लढ्यात सहभाग अशा कितीतरी गोष्टी बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवनात केल्या. समाजासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. समाजामधील तळागाळातील व्यक्तींचा प्रामुख्याने विचार केला. शिक्षणासाठी, समाजाच्या कल्याणासाठी आयुष्यभर संघर्ष केला. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, असा गुरुमंत्र दिला. असामान्य कर्तृत्व गाजवणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन !!!

online e - quiz लिंक खालीलप्रमाणे आहे 
👉https://forms.gle/GjQQUeKwX3VsexLaA

🏵️प्राचार्य डॉ. अनिल पाटील 

🏵️ प्रा वर्षा पोतदार (राज्यशास्त्र विभागप्रमुख) 

🏵️ डॉ एम.आर. कांबळे (समन्वयक)

(संपर्क-🪀8888437240/📱8625807240)

No comments:

Post a Comment